या सर्व कविता व्हाटस अप वरील आहेत.
कविता कवींच्या नावासह प्रसिदध करण्यात आलेल्या आहेत .
कविता वाचण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
"बायको सूंदर मैत्रीण असते"
एक सूंदर मैत्रीण असते,
एक दिवस नवरापण सोडून द्यावा,
एक दिवस का होईना तिचा मित्र बनून पाहावा,
मग कळेल प्रत्येक क्षण आहे नवा,
तिच्या सोबत हा क्षण असाच राहायला हवा,
प्रेमात मग त्याचा ती नव्याने पडेल,
आणि मग ती बायको बायको नसेल ,
त्याचीच सूंदर मैत्रिण झालेली असेल
कविता कवींच्या नावासह प्रसिदध करण्यात आलेल्या आहेत .
Copy
…..paste
पहाटेच जाग आली
कोणी
टकटक करीत होते,
दार
उघडून पाहिले बाहेर
तर कुणीच
उभे नव्हते..
आवाजाच्या
दिशेने बघताच
खिडकीवर
दिसला एक पक्षी,
चोचीने
टकटक करीत तावदानावर
उमटवीत
होता नक्षी...
"का रे
बाबा?" विचारले तर म्हणाला,
"भाड्याने
मिळेल का एखादे झाड
घरटे
बांधण्यासाठी?,
एकटा
कुठेही कसाही राहिलो असतो
पण जागा
हवी
पिल्लांसाठी...
तुमच्या
भाऊबंदांनी लुटले
आमचे रान
केले निर्वासित,
बेघर
झालोच दाण्यापाण्यासाठी
असतो आता
फिरस्तित..
वर
पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत
थोडे
दाणे अन पाणी,
पण
निवाऱ्याचे काय?
हे
लक्षात घेतच नाही कुणी...
पोटाला
हवेच, खातो ती भिक
अन नेतो
थोडे घरी,
खायला तर
हवच,
जरी
डोक्यावर छप्पर नसले तरी...
कधीकधी
वाटते करावी आत्महत्या
बसुन
विजेच्या तारेवर,
किंवा
द्यावा जीव लोटून
त्या उंच
मोबाईल टाॅवरवर...
जसे मग
आत्महत्ये नंतर
सरकार
काही देते शेतक-याला,
तसेच
मिळेल का एखादं झाड
माझ्या
पिल्लांना तरी आस-याला"
ऐकून मी
चक्रावलो, खरचं
एवढा
विचार मी नव्हता केला,
जंगलतोडीत
त्यांच्या घरांचा
विचार
कुठेच नाही झाला...
मी हात
जोडून म्हटले,
"त्यांच्या
वतीने मी तुझी माफी मागतो,
पण
आत्महत्या करू नको
खरचं
मनापासुन सांगतो...
तोपर्यंत
कुंडीतल्या रोपावर
बांध
वनरुम किचन खोपा,
अडचण
होईल पण आत्ता तरी
एवढाच
उपाय आहे सोपा..."
तो
म्हणाला, "खुप उपकार होतील,
पण भाडे
कसे देणार?",
"रोज
त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव,
बाकी
काही नाही मागणार..."
तो
म्हणाला, "मला तुम्ही भेटलात
पण बाकी
नातलगांच काय?,
त्यांना
पण घरट्यासाठी जागा हवी,
कुठे
ठेवतील पाय...?"
"अरे
लावताहेत आता झाडे
अन
जगवतात आता कुणी कुणी,
बदलतेय
चित्र हळू हळू, त्यांना सांग
आत्महत्या
करू नका कुणी..."
ऐकुन तो
पक्षी उडाला
काड्या
जमवायला घरट्यासाठी,
मी पण
मोबाइल उचलला
तुम्हा
सगळ्यांना हे सांगण्यासाठी...
त्याची
खिडकीवरची टकटक
माझ्या
मनाचे उघडले कवाड,
वाचुन
तुम्ही पण लावाल ना
कुंडीत
वा अंगणात एकतरी झाड...
*निदान एक
तरी झाड !*
🌳🌳 🌳🌳🌳🌳
*लेखक\ कवीं-अज्ञात*
*माझ्या कविता*
*माने साहेबांबद्दल*
रामप्रहरी मॅसेज खूप
छान
व्यक्तीमत्त्त्वअसं
कर्तव्याची खान
तुम्ही खरेच आमचे प्रेरणास्थान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
वक्तृत्व जसं गाण्यातील ताण
कर्तृत्व
असं प्रगतीतील प्राण
ताकद
उगवायची माळरानात धान
साहेब
तुमचा आम्हा अभिमान
व्हॉटसअॅप टायपिंग फार वेगवान
प्रेरणेने मिळवलं दुष्काळात दान
डिजिटल
बीटचा वाढला मान
साहेब
तुमचा आम्हा अभिमान
कुमठेबीट
दौऱ्याने वाढले ज्ञान
ज्ञानरचनावादाचे
मग आले भान
कदमवाडीने
जागे केले आत्मभान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
धोत्रीतील
भाषण खूपच छान
चिंचोलीत
तर सपत्नीक रक्तदान
मनापासून काम हेच समाधान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
बीटचे
शिक्षक जणू संक्रांतीच वाण
काम
तुमच ऊर्जा भरण्याच महान
स्तुतिच्या
काताने छानरंगवता पान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
ISO कुंभारीने वाढवली शान
खरंच
शोभता आमचे कप्तान
संकल्प
प्रगत बीटचा हीच तहान
साहेब
तुमचा आम्हा अभिमान.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री.
क्षिरसागर आर .एम.
प्रा. शा.काटगाव
👍👍👍👍👍👍👍👍
निंदकाचं घर
कोणी तरी आपल्यावर
नक्कीच हसावं,
निंदकाचं घर आपल्या
शेजारीच असावं।
त्याच्या हसण्यात त्याच
जळणं दिसावं,
त्याच्या जळण्यात आपल्या
उन्नतीच पाऊल ठसावं
त्यानंही कधी आपल्यावर
उगाचच रुसावं,
कधी कधी तर आपल्यासाठी
नाकच मुरडावं।
कपाळाला आठ्या अन्
कान्या डोळ्यान बघावं,
जीवाची घालमेल अन्
ओठांवर बुटबुटणं असावं।
अधुनमधून मुडमुड के
पहाणं असावं,
कधी असचं ताणून
जाणंही असावं।
कधी आपल्या पाठीमागे
कुजबुजनं पण असावं,
कधीतरी फणकाऱ्यानं
डसणं पण असावं।
कोणी तरी आपल्यावर
नक्कीच हसावं,
निंदकाचं घर आपल्या
शेजारीच असावं।
✍🏻
श्रीमती. थडवे संगीता उत्तमराव
उस्मानाबाद.
गच्च मिठी मारली पाहिजे*
*कवी : प्रा.विजय पोहनेरकर*
--------------------------------
*नातं कोणतंही असो*
*मतभेद कितीही असो*
*संबध तोडण्याची भाषा*
*मुळीच कधी करू नको*
*प्रत्येक माणूस वेगळा*
*विचारसरणी वेगळी*
*मनुष्य जन्मा तुझी*
*कहाणीच आगळी-वेगळी*
*बापा सारखा मुलगा नसतो*
*मुला सारखी सून नसते*
*नवरा आणि बायकोचे तरी*
*कुठे तेवढे पटत असते ?*
*जरी नाही पटले तरी*
*गाडी मात्र हाकायची*
*अबोला धरून विभक्त होऊन*
*सारीच गणितं चुकायची*
*काही धरायचं असतं*
*काही सोडायचं असतं*
*एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून*
*एकमेकाला सोडायचं नसतं*
*चुकल्यावर बोलावं*
*बोलल्यावर ऐकूण घ्यावं*
*एकांतात बसल्यावर*
*अंतरंगात डोकवावं*
*राग मनात ठेवला म्हणून*
*कोणाचं भलं झालं का ?*
*बिनसावलीच्या झाडा जवळ*
*पाखरू कधी आलं का ?*
*समोरची व्यक्ती चुकली तरी*
*प्रेम करता आलं पाहिजे*
*झालं गेलं विसरून जाऊन*
*गच्च मिठी मारली पाहिजे*
*स्वागत होईल न होईल*
*जाणं येणं चालू ठेवा*
*समोरचा जरी चुकला तरी*
*म्हण " खुशाल ठेव देवा !"*
*आयुष्य खूप छोटं आहे*
*हां हां म्हणता मृत्यू येईल*
*प्रेम करायचं राहिलं म्हणून*
*शेवटी खूप पश्चताप होईल*
*लक्षात ठेवा नात्या पेक्षा*
*दुसरं काहीही मोठं नाही*
*आपलं माणूस आपल्या जवळ*
*या सारखी श्रीमंती नाही !*
*कवी : प्रा.विजय पोहनेरकर*
--------------------------------
*नातं कोणतंही असो*
*मतभेद कितीही असो*
*संबध तोडण्याची भाषा*
*मुळीच कधी करू नको*
*प्रत्येक माणूस वेगळा*
*विचारसरणी वेगळी*
*मनुष्य जन्मा तुझी*
*कहाणीच आगळी-वेगळी*
*बापा सारखा मुलगा नसतो*
*मुला सारखी सून नसते*
*नवरा आणि बायकोचे तरी*
*कुठे तेवढे पटत असते ?*
*जरी नाही पटले तरी*
*गाडी मात्र हाकायची*
*अबोला धरून विभक्त होऊन*
*सारीच गणितं चुकायची*
*काही धरायचं असतं*
*काही सोडायचं असतं*
*एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून*
*एकमेकाला सोडायचं नसतं*
*चुकल्यावर बोलावं*
*बोलल्यावर ऐकूण घ्यावं*
*एकांतात बसल्यावर*
*अंतरंगात डोकवावं*
*राग मनात ठेवला म्हणून*
*कोणाचं भलं झालं का ?*
*बिनसावलीच्या झाडा जवळ*
*पाखरू कधी आलं का ?*
*समोरची व्यक्ती चुकली तरी*
*प्रेम करता आलं पाहिजे*
*झालं गेलं विसरून जाऊन*
*गच्च मिठी मारली पाहिजे*
*स्वागत होईल न होईल*
*जाणं येणं चालू ठेवा*
*समोरचा जरी चुकला तरी*
*म्हण " खुशाल ठेव देवा !"*
*आयुष्य खूप छोटं आहे*
*हां हां म्हणता मृत्यू येईल*
*प्रेम करायचं राहिलं म्हणून*
*शेवटी खूप पश्चताप होईल*
*लक्षात ठेवा नात्या पेक्षा*
*दुसरं काहीही मोठं नाही*
*आपलं माणूस आपल्या जवळ*
*या सारखी श्रीमंती नाही !*
*न रड़ता वाचून दाखवा* 😔 😔😔😢😥😔😔
एक सुंदर पत्र आईविना असलेल्या एका मुलाने आपल्या आईस काव्य रूपाने लिहुन पाठविले आहे ते मला आवडले
म्हणून मी तुम्हा सर्वांना पाठवित आहे.
प्रिय आईस,
पत्ता: देवाचे घर,
तुझा हात हवा होता
सदा माझ्या उश्यावर,
थोपटून मला झोपवायला
अचानक जाग आल्यावर.
मी अजून सुद्धा दचकून
जागा होतो मधिच,
तुझी काळजी रात्रभर
सतावत राहते उगीच.
तू का इतक्या लवकर
सोडून गेलीस गाव माझं,
'आईविना पोर' असं
घेतात लोकं नाव माझं.
वरवरच्या पदार्थांची मला
चवच लागत नाही,
काय करू तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.
पोरकेपणाची माझ्या भोवती
का ठेऊन गेलीस जाळ,
का खरंच इतकी कच्ची
होती, तुझ्या माझ्यातली नाळ.
तिथं कुणी आहे तुझ्याशी
बोलायला भरपूर,
उगाच रडत राहू नकोस
दाबून स्वतःचा ऊर.
बघ आई आता मी
रडत नाही पडलो तरी,
मला ठावूक आहे तू
गेली आहेस देवाघरी.
भूक लागली तरी
बिलकूल मी रडत नाही,
कारण मी हसल्या शिवाय
तुला चैन पडत नाही.
पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून, पुसून डोळे, मी गप्प झोपी जातो.
बघ तुझं बाळ किती
समजूतदार झालं आहे,
आणि वय कळण्याआधी
वेडं वयात आलं आहे.
अजिबात म्हणजे अजिबात
त्रास देत नाही पप्पाला,
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग बाप्पाला.
आणि सांग कि
हे शहाण बाळही आहे हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईल म्हणावं कट्टी.
मी आता थकलोय
तुला ढगांमध्ये पाहून,
ये आता भेटायला
नजर तिथली चुकवून.
जमलं जर का सुट्टी घ्यायला
तर ये निघून अशीच,
पोट भरतं ग रोज
पण मायेची भूक अजून तशीच....
मायेची भूक अजून तशीच....
मायेची भूक अजून तशीच....🙏
आईची किम्मत हि ती नसल्यावरच कळनाऱ्याला कळते
म्हनुन,,,
त्या माउलीची तिच्या हयातीतच सेवा करा आणि
आईला दु:ख देउ नका !
😔😥😢😔😢😔😔
👏आवडलच आपल्याला तर वेळ काढून शेअर करा
पाडव्याच्या दिवशी आवर्जून वाचावे असे काहीतरी.....
पारिजातकाचा सुवास बायको असते,
निरपेक्ष प्रेमाचा सागर बायको असते,
नवऱ्याची प्रेरणा बायको असते,
जीवनाची अरधांनगिणी बायको असते,
बायको, बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
सासूसासऱ्यास आई वडील मानते,
नवऱ्यात परमेश्वर पहाते,
सारे आयुष्य सासरसाठी वाहते,
संसारात स्वतःलाही विसरते
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते
आल्या जरी असंख्य काटेरी वाटा,
बायको, बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
सासूसासऱ्यास आई वडील मानते,
नवऱ्यात परमेश्वर पहाते,
सारे आयुष्य सासरसाठी वाहते,
संसारात स्वतःलाही विसरते
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते
आल्या जरी असंख्य काटेरी वाटा,
तरी ती धीराने सामोरी जाते,
नवऱ्य्याच्या सुख दुःखात साथ देते,
घराची ती तुळस होते
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते
कधी हसते, कधी रुसते,
कधी उगाच रागानी पहाते,
कधी आसवांच्या सागरात,
नवऱ्यासोबत भिजते,
कधी सुखाचे चांदणं टिपते,
खरंच बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
सासरचे गुण जगभर गाते,
बायकोच सांभाळते सर्व नाते,
घरात स्वर्ग तिच करते,
मनातील दुरावे तिच संपवते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
माहेराच्या आठवणीत क्षणभर डोळे ओलावते,
मनातील दुःख तिचे कोणी का जाणते?,
संसारास ती अमूल्य मानते,
प्रत्येक जन्म ह्याच संसारासाठी मागते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते
तिच्या मनात साऱ्यांसाठी आपुलकी असते,
सुखी संसाराचे ती मनोरे रचते,
माहेरी सोडून परक्या दारी येते,
सासरला ती आपले करते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
कधी नवऱ्या साठी साज शृंगारात सजते,
अबोलीचा गजरा केसात माळते,
आरश्यास घडी घडी सूंदर असल्याची साक्ष मागते,
नवरयाच्या एका स्पर्शानेच ती मोहरते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
नवऱ्यास गुण दोषा सोबत स्वीकारते,
पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे कोडे तिच सोडवते,
थोड्या मायेची अपेक्षा ती ठेवते ,
नवऱ्याचा डोळ्यात केवळ प्रेम शोधते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
नवऱ्याचे नवरापण तिच सोसते,
मनात दुःख लपवून जगासमोर हसते,
तिची किंमत त्याला तेव्हाच कळते,
जेव्हा ती त्याच्या सोबत नसते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
बायको तर मैत्रीण होऊन जाते,
पण नवरा कधी मित्र होत नाही?,
का नवऱ्या बायकोच्या नात्याला,
तो मैत्रीचे नाव देत नाही?,
पण बायको ह्या नात्यातील मैत्रीला असचं जपते,
कारण बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
मुलगी बहीण सून आईची ती सर्व पात्रे साकारते,
नवऱ्यासाठी मात्र बायकोच्या पात्रातून मैत्रीण होते,
पण नवरा कधी नवरापण का सोडत नाही?,
तिच्या सारखे तो तिचा मित्र का होत नाही?,
त्याला का ते उमजत नसते ,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
हातात हात घेऊन तिच्या सोबत चालावे,
तिच्या सहवासात त्यानेही फुलावे, तिच्या आसमंत प्रेमात त्यानेही झुलावे,
तिच्या सारखे प्रेम मग त्यानेही करावे , इतकेचं स्वप्न ती बघते,
बायको बायको नाही, घराची ती तुळस होते
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते
कधी हसते, कधी रुसते,
कधी उगाच रागानी पहाते,
कधी आसवांच्या सागरात,
नवऱ्यासोबत भिजते,
कधी सुखाचे चांदणं टिपते,
खरंच बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
सासरचे गुण जगभर गाते,
बायकोच सांभाळते सर्व नाते,
घरात स्वर्ग तिच करते,
मनातील दुरावे तिच संपवते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
माहेराच्या आठवणीत क्षणभर डोळे ओलावते,
मनातील दुःख तिचे कोणी का जाणते?,
संसारास ती अमूल्य मानते,
प्रत्येक जन्म ह्याच संसारासाठी मागते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते
तिच्या मनात साऱ्यांसाठी आपुलकी असते,
सुखी संसाराचे ती मनोरे रचते,
माहेरी सोडून परक्या दारी येते,
सासरला ती आपले करते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
कधी नवऱ्या साठी साज शृंगारात सजते,
अबोलीचा गजरा केसात माळते,
आरश्यास घडी घडी सूंदर असल्याची साक्ष मागते,
नवरयाच्या एका स्पर्शानेच ती मोहरते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
नवऱ्यास गुण दोषा सोबत स्वीकारते,
पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे कोडे तिच सोडवते,
थोड्या मायेची अपेक्षा ती ठेवते ,
नवऱ्याचा डोळ्यात केवळ प्रेम शोधते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
नवऱ्याचे नवरापण तिच सोसते,
मनात दुःख लपवून जगासमोर हसते,
तिची किंमत त्याला तेव्हाच कळते,
जेव्हा ती त्याच्या सोबत नसते,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
बायको तर मैत्रीण होऊन जाते,
पण नवरा कधी मित्र होत नाही?,
का नवऱ्या बायकोच्या नात्याला,
तो मैत्रीचे नाव देत नाही?,
पण बायको ह्या नात्यातील मैत्रीला असचं जपते,
कारण बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
मुलगी बहीण सून आईची ती सर्व पात्रे साकारते,
नवऱ्यासाठी मात्र बायकोच्या पात्रातून मैत्रीण होते,
पण नवरा कधी नवरापण का सोडत नाही?,
तिच्या सारखे तो तिचा मित्र का होत नाही?,
त्याला का ते उमजत नसते ,
बायको बायको नाही,
एक सूंदर मैत्रीण असते,
हातात हात घेऊन तिच्या सोबत चालावे,
तिच्या सहवासात त्यानेही फुलावे, तिच्या आसमंत प्रेमात त्यानेही झुलावे,
तिच्या सारखे प्रेम मग त्यानेही करावे , इतकेचं स्वप्न ती बघते,
एक सूंदर मैत्रीण असते,
एक दिवस नवरापण सोडून द्यावा,
एक दिवस का होईना तिचा मित्र बनून पाहावा,
मग कळेल प्रत्येक क्षण आहे नवा,
तिच्या सोबत हा क्षण असाच राहायला हवा,
प्रेमात मग त्याचा ती नव्याने पडेल,
आणि मग ती बायको बायको नसेल ,
त्याचीच सूंदर मैत्रिण झालेली असेल
No comments:
Post a Comment