Home

सुस्वागतम ! आपले सहर्ष स्वागत करीत आहे !

Monday, 15 January 2024

मकरसंक्रांत

 आपल्या देशात अनेक सण साजरे केले जातात, त्यामुळे आपल्या भारत देशाला "सणांची भूमी" असेही म्हटले जाते. प्रत्येक सण, उत्सव साजरा करण्यामागे काही ना काही धार्मिक, पौराणिक, वैज्ञानिक, शास्त्रीय कारणं, कथा, प्रदद्या आहेत.  जेव्हा सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात, धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. एका राशीतुन दुस-या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रीयेला संक्रांती म्हणतात. वर्षभरात प्रत्येक महिन्याला एक अशा बारा संक्रांती येतात. परंतु पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीला खास महत्व आहे. सुर्याचा एका राशीतून दुसन्या राशीत प्रवेश म्हणजेच परिवर्तन. सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर दिवसामधे परिवर्तन होते. मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होत जातो, आणि राज लहान होत जाते. या दिवसापासून सूर्य तापायला तयार होतो आणि वातावरणात असणारा गारवा, हुडहुडी भरणारी थंडी गायब होण्यास सुरवात होते. आयुष्यात जर आनंद, उत्साह, सुख नसेल तर माणूस नैराश्याकडे  जातो, म्हणून जीवनात उत्साह, आनंद निर्माण करणाऱ्या क्षणांची खूप आवश्यकता असते, आणि हे आनंदाचे क्षण आपल्याला सणांमुळे मिळतात. म्हणून आपल्या संस्कृतीत सणांना विशेष महत्व आहे. मकर संक्रातीला पतंग उडविण्याची प्रथा आहे. पतंगाप्रमाणे उत्साहाने, साहसाचे पंख लावून हवेत उडावे पण शिस्त, नियम, संयमाची दोर ही सोबत असायला हवी, नाहीतर पतंग हवेत भरकटायला लागतो. पतंग जेव्हा हवेत उडत असतो, तेव्हा एक पतंग दुसऱ्या पतंगात अडकला  जातो. त्यावेळेस ढील सोडली तर पतंग न  अडकता वेगळा होतो आणि जर दोरा ओढला तर पतंग कापला जातो, तसेच आपल्या मानवी नात्यांचे ही असते. 


There are so many reasons to enjoy this beautiful life.