Home

सुस्वागतम ! आपले सहर्ष स्वागत करीत आहे !

Friday, 10 May 2019

उत्तम दर्जेदार पुस्तकं.

    लिंक

                     👉👀📝         Click

या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिक करा. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. फ़्री आणि ईझी. बेसुमार मराठी पुस्तकं वाचा.
उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही. ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही.

मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे.

Saturday, 4 May 2019

कविता संग्रह

                       या सर्व कविता व्हाटस अप वरील आहेत.

            कविता कवींच्या नावासह  प्रसिदध करण्यात आलेल्या आहेत .

          कविता वाचण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.  
          
           →CLICK



   Copy …..paste       


पहाटेच जाग आली
कोणी टकटक करीत होते,
दार उघडून पाहिले बाहेर
तर कुणीच उभे नव्हते..

आवाजाच्या दिशेने बघताच
खिडकीवर दिसला एक पक्षी,
चोचीने टकटक करीत तावदानावर
उमटवीत होता नक्षी...

"का रे बाबा?" विचारले तर म्हणाला,
"भाड्याने मिळेल का एखादे झाड
घरटे बांधण्यासाठी?,
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो
पण जागा हवी
पिल्लांसाठी...

तुमच्या भाऊबंदांनी लुटले
आमचे रान केले निर्वासित,
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी
असतो आता फिरस्तित..
वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत
थोडे दाणे अन पाणी,
पण निवाऱ्याचे काय?
हे लक्षात घेतच नाही कुणी...
पोटाला हवेच, खातो ती भिक
अन नेतो थोडे घरी,
खायला तर हवच,
जरी डोक्यावर छप्पर नसले तरी...
कधीकधी वाटते  करावी आत्महत्या
बसुन विजेच्या तारेवर,
किंवा द्यावा जीव लोटून
त्या उंच मोबाईल टाॅवरवर...

जसे मग आत्महत्ये नंतर
सरकार काही देते शेतक-याला,
तसेच मिळेल का एखादं झाड
माझ्या पिल्लांना तरी आस-याला"
ऐकून मी चक्रावलो, खरचं
एवढा विचार मी नव्हता केला,
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा
विचार कुठेच नाही झाला...

मी हात जोडून म्हटले,
"त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,
पण आत्महत्या करू नको
खरचं मनापासुन सांगतो...
तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर
बांध वनरुम किचन खोपा,
अडचण होईल पण आत्ता तरी
एवढाच उपाय आहे सोपा..."

तो म्हणाला, "खुप उपकार होतील,
पण भाडे कसे देणार?",
"रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव,
बाकी काही नाही मागणार..."
तो म्हणाला, "मला तुम्ही भेटलात
पण बाकी नातलगांच काय?,
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी,
कुठे ठेवतील पाय...?"
"अरे लावताहेत आता झाडे
अन जगवतात आता कुणी कुणी,
बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग
आत्महत्या करू नका कुणी..."
ऐकुन तो पक्षी उडाला
काड्या जमवायला घरट्यासाठी,
मी पण मोबाइल उचलला
तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी...

त्याची खिडकीवरची टकटक
माझ्या मनाचे उघडले कवाड,
वाचुन तुम्ही पण लावाल ना
कुंडीत वा अंगणात एकतरी झाड...

*निदान एक तरी झाड !*

 🌳🌳 🌳🌳🌳🌳      *लेखक\ कवीं-अज्ञात*



              


*माझ्या कविता*

  *माने साहेबांबद्दल*       

      रामप्रहरी मॅसेज खूप छान                    
व्यक्तीमत्त्त्वअसं कर्तव्याची खान
                             तुम्ही खरेच आमचे प्रेरणास्थान                                      
  साहेब तुमचा आम्हा अभिमान
                               वक्तृत्व जसं गाण्यातील ताण                                     

कर्तृत्व असं प्रगतीतील प्राण
ताकद उगवायची माळरानात धान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
                        व्हॉटसअॅप टायपिंग फार वेगवान                             

 प्रेरणेने मिळवलं दुष्काळात दान
डिजिटल बीटचा वाढला मान
साहेब तुमचा आम्हा अभिमान
कुमठेबीट दौऱ्याने वाढले  ज्ञान
ज्ञानरचनावादाचे मग आले भान
कदमवाडीने जागे केले आत्मभान
   साहेब तुमचा आम्हा अभिमान

धोत्रीतील भाषण खूपच छान
चिंचोलीत तर सपत्नीक रक्तदान
  मनापासून काम हेच समाधान
  साहेब तुमचा आम्हा अभिमान

बीटचे शिक्षक जणू संक्रांतीच वाण
काम तुमच ऊर्जा भरण्याच महान
स्तुतिच्या काताने छानरंगवता पान
   साहेब तुमचा आम्हा अभिमान

ISO कुंभारीने वाढवली शान
खरंच शोभता आमचे कप्तान
संकल्प प्रगत बीटचा हीच तहान
  साहेब तुमचा आम्हा अभिमान.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री. क्षिरसागर आर .एम.
         प्रा. शा.काटगाव

                                          
   👍👍👍👍👍👍👍👍           
   

                         निंदकाचं घर




कोणी तरी आपल्यावर

नक्कीच हसावं,

निंदकाचं घर आपल्या
शेजारीच असावं।


त्याच्या हसण्यात त्याच
जळणं दिसावं,
त्याच्या जळण्यात आपल्या
उन्नतीच पाऊल ठसावं
त्यानंही कधी आपल्यावर
उगाचच रुसावं,
कधी कधी तर  आपल्यासाठी
नाकच मुरडावं।


कपाळाला आठ्या अन्
कान्या डोळ्यान बघावं,
जीवाची घालमेल अन्
ओठांवर बुटबुटणं असावं।


अधुनमधून मुडमुड के
पहाणं असावं,
कधी असचं ताणून
जाणंही असावं।


कधी आपल्या पाठीमागे
कुजबुजनं पण असावं,
कधीतरी फणकाऱ्यानं
डसणं पण असावं।


कोणी तरी आपल्यावर
नक्कीच हसावं,
निंदकाचं घर आपल्या
शेजारीच असावं।

✍🏻
श्रीमती. थडवे संगीता उत्तमराव
उस्मानाबाद.

अनाम वीरा

         प्रा. शाळा कसई


     पाहण्यासाठी 👉   CLICK

बीटस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बीट मंगरूळ 2018/19

बीटस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बीट मंगरूळ                                          2018/19

                   
                                   
                       👍✨✨✨
                      🎉😊👏😁👏😃🎉
                       Congratulations!

     बीट स्तरीय सावित्री जोतिबा फुले शिक्षक पुरस्कार..                                बीट मंगरूळ

पुरस्कार प्राप्त शिक्षक / शिक्षिका
"""""""""""""""""""""""
१) श्री पवार अमोल अश्रुबा,प्रा. शि. जि.प.प्रा.शा. कदमवाडी (मा.)
२) श्रीमती माने रोहिणी बबन प्रा. शि.प्रा. शा. इंदिरा नगर चि.
३)श्री भोयटे बलभीम सुभाष प्रा. शि.प्रा. शा. चव्हाण वाडी
४)  श्री पवार पाटील सुवर्णा सुरेश प्रा. शा. काटगाव
५) श्री ठोंबरे धनंजय शिवाजी प्रा. शि. प्रा. शा. बसवेश्वर नगर चि.
६) श्री  राऊत सुरेश लक्ष्मणराव प्रा. प. प्रशाला  मंगरूळ
७)श्रीमती चूंगे सरीता बाबासाहेब प्रा.प.प्रा. शा. कसई
८) श्री सुरवसे  सुसेन बळीराम प्रा. शा. बसवंत वाडी.
९) श्रीमती मुकरे पार्वती विठ्ठल प्रा. शि.प्रा. शा.मंगरूळ
१०) श्रीमती गाडे अश्विनी अर्जुनराव प्रा. शि. प्रा. शा. पुजारी नगर चि.
११)श्री इंगळे गोविंद भैरू प्रा. शि. कें.प्रा. शा. नांदुरी
१२) श्रीमती सूर्यवंशी नंदा महादेव प्रा.प.प्रा. शा.चिंचोली
१३) श्री चव्हाण बाबु लिंबा कें. प्रा. शा. येवती
१४) श्रीमती कुलकर्णी माधुरी किशोर  प्रा. शि.प्रा. शा. उमरगा चि.
१५) श्री केदार नारायण जयसिंग प्रा. शि. प्रा. कदमवाडी आ.
१६) श्रीमती घोडके सुमनताई सीताराम प्रा. शि. प्रा. शा. आरळी खू.
१७) श्रीमती कांबळे सुषमा शेषेराव प्रा. शि. प्रा. शा.दिंडेगाव
१८) श्री म्हेत्रे विठ्ठल कुबेर मुख्याध्यापक एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा मंगरुळ (यमगर  वाडी )
१९)श्रीमती बिराजदार लक्ष्मी करबसप्पा मुख्याध्यापक दत्तु आण्णा पाटील माध्यमिक विद्यालय चिवरी
२०) श्री शिंदे सुदर्शन सदाशिव मुख्याध्यापक इंदिरा माध्यमिक विद्यालय मंगरूळ


               व्हिडिओ पाहण्यासाठी   क्लिक करा**
                       

                     Ⓒⓛⓘⓒⓚ



व्हिडिओ   निर्माती :   श्रीमती रंजना स्वामी

स्टीव्ह जॉब्झ : अधिकृत चरित्र - वॉल्टर आयझॅक्सन मराठी अनुवाद - विलास साळुंके

स्टीव्ह जॉब्झ : अधिकृत चरित्र - वॉल्टर आयझॅक्सन
मराठी अनुवाद - विलास साळुंके
          CLICK
स्टीव्ह जॉब्झच्या संपूर्ण सहकार्यानं वॉल्टर आयझॅक्सननी लिहिलेलं अधिकृत चरित्र. दोन वर्षाच्या कालावधीत घेतलेल्या स्टीव्ह जॉब्झच्या चाळीसहून अधिक मुलाखतींवर आधारित.  त्याचबरोबर शंभरहून अधिक कुटुंबीय, मित्रमंडळी, सल्लागार, प्रतिस्पर्धक आणि सहकारी यांच्याही मुलाखती - असं हे पुस्तक एका उन्मेषपूर्ण व्यावसायिकाच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाच्या जीवनाचा प्रचंड वेगाने वर-खाली होत असलेला ‘रोलरकोस्टर’ आलेख सांगते, ज्याच्या पूर्णत्वाच्या उत्कटतेने आणि महत्त्वाकांक्षेने सहा उद्योगांमध्ये क्रांती आणली : पर्सनल कम्प्यूटर्स, अॅनिमेटेड चित्रपट, संगीत, फोन, टॅब्लेट कम्प्यूटर्स आणि डिजिटल प्रकाशन व्यवसाय.

२१ व्या शतकात कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे, किंबहुना ती काळाची गरज आहे, हे त्यानं ओळखलं आणि म्हणूनच कल्पकतेची भरारी आणि तंत्रज्ञानाची विलक्षण शक्ती यांचा मिलाफ असलेली ‘अॅपल’ नामक कंपनी उभी करून जॉब्झ जणू सृजनशील आणि व्यावहारिक कल्पकतेचं मूर्तिमंत उदाहरणच ठरले. स्टीव्ह जॉब्झनी जरी या पुस्तकासाठी सहकार्य केलं असलं तरी त्यानी त्यातील लिखाणावर कुठल्याही प्रकारे बंधन घातलं नाही. ‘‘ज्यांचा अभिमान वाटू नये अशा कित्येक गोष्टी मी केल्या आहेत. परंतु माझ्या कपाटात दडवून ठेवलेलं असं काहीही नाहीये, जे बाहेर येऊ नये म्हणून मी प्रयत्न करावा,’’ ते सांगतात.

जॉब्झ त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल, प्रतिस्पर्ध्यांबद्दल मनमोकळेपणाने आणि कधीकधी अगदीच स्पष्टपणे बोलतात. त्याप्रमाणेच त्यांचे मित्र, शत्रू आणि सहकारीसुद्धा त्यांचा झपाटलेपणा, त्यांचे दोष, परिपूर्णतेचा ध्यास, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, कला, मोहकता आणि त्यांचा नियंत्रणाचा हट्ट, ज्यांनी त्यांच्या व्यवसायाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला आकार दिला आणि ज्यातून नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्सची निर्मिती झाली... यांवर आपली प्रांजळ मतं व्यक्त करतात. ज्याप्रमाणे ‘अॅपल’ची हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एका एकसंध यंत्रणेचा अविभाज्य भाग म्हणून जोडलेले असतात, त्याप्रमाणेच जॉब्झचं व्यक्तिमत्त्व, त्यांची उत्कट जिद्द आणि त्यांनी निर्माण केलेली प्रोडक्ट्स हीसुद्धा एका अनन्य संबंधानी जोडलेली असतात. त्यामुळेच त्याचं आयुष्य म्हणजे कल्पकतेच्या, जिद्दीच्या, नेतृत्वाच्या आणि नीतिमूल्यांच्या धड्यांनी भरलेली उद्बोधक आणि सूचनात्मक कहाणी आहे.