जाॅबचार्ट चा विचार करता विस्तार अधिकारी यांना शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक तिन्ही प्रकारची कर्तव्ये पार पाडावी लागतात. 14 नोव्हेंबर 1994 च्या शासननिर्णयानुसार केंद्रप्रमुख पदाची निर्मिती झाल्यानंतर विस्तार अधिकारी यांचे शैक्षणिक कार्याकडे दुर्लक्ष होऊ लागले, असे बोलले जाऊ लागले. यामध्ये बर्याच अंशी तथ्य आहे हे मान्य करावे लागेल. विस्तार अधिकारी निव्वळ *साहेब* म्हणून वागत असल्याचे लक्षात आल्यानेच हे पद शासनाकडून दुर्लक्षित केले गेले असावे. 'केंद्रप्रमुख पद आल्यापासून विस्तार अधिकारी पदाकडे दुर्लक्ष, हे पद रद्द करण्याचा शासनाचा विचार' अशा चर्चा संघटना पातळीवर रंगू लागल्या.
परंतु 22 जून 2015 च्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र च्या शासननिर्णयानंतर कुमठे बीट च्या शैक्षणिक कार्याची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली. या बीट ला हजारो शिक्षकांनी भेटी दिल्या. श्रीमती भराडे मॅडम यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक विस्तार अधिकारी आपापल्या परीने कामाला लागले. त्याचाच परिणाम म्हणून या समुहावर चर्चेत असणारे व काही या समुहात नसणारेही शैक्षणिक कार्याकडे जाणीवपूर्वक अधिक लक्ष देऊन काम करणाऱ्या विस्तार अधिकारी यांची फळी तयार होत आहे. आणखीही बहुतांश बांधव यात मागे आहेत, किंबहुना ते अजून आपल्यातील साहेब ( साहेब ची प्रत्येकाची व्याख्या आपापल्या सोयीप्रमाणे असते.) विसरायला तयार नाहीत. त्यांनी आता बदलायला हवे.
हे सांगत असताना मला आणखी एका मुद्याकडे आपले सर्वांचे लक्ष वेधायचे आहे....
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नंतर काही नवीन संकल्पना रूढ होत आहेत. क्षेत्रीय अधिकारी विशेषतः विस्तार अधिकारी यांनी *पर्यवेक्षण आणि संनियंत्रण करण्यापेक्षा कोचिंग आणि मेंटाॅरिंग वर भर द्यावा*, *साहाब हे साथी*, शिक्षकांना टाचण विचारू नये, शाळेच्या वार्षिक तपासणीची गरज नाही, इत्यादी. या सर्व संकल्पना आदर्श अशाच आहेत. यापद्धतीनेच प्रेरणा देऊन अधिक चांगले काम उभं राहू शकते, असा बर्याच लोकांचा आणि माझाही अनुभव आहे. (अलिकडे एका राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत 'कोण कुणाला प्रेरणा देऊ शकत नाही' असे वाक्य एका वरीष्ठ अधिकार्याकडून ऐकायला मिळाले. ते एखाद्या विशिष्ट परिस्थितीवर आधारित असावे. असो.)
परंतु क्षेत्रीय अधिकारी यांनी केवळ वरील भूमिकेतून काम केल्याने आपण सर्व शिक्षकांना कामाला लावू शकत नाही. असे माझे ठाम मत झाले आहे. ( याला काही सन्मान्य अपवाद असतील. ) आपल्या या 100% बदलेल्या भूमिकेमुळे कामचुकार(नोकरीला दुय्यम, टाईमपास समजणार्या) शिक्षकांना कोणताही धाक राहिला नाही. आणि त्यामुळे काठावरील शिक्षक या कामचुकार शिक्षकांकडे ओढले जात आहेत. म्हणून प्रशासन आणि संनियंत्रण याला ही शिक्षण प्रक्रियेत तेवढेच महत्वाचे स्थान आहे, अशी धारणा आहे. आमच्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. जीवनराव गोरे हे एक उदाहरण नेहमी देत असंत... काम करणाऱ्यांबरोबरच ते बघणाऱ्या डोळ्यांची संख्या ही पुरेशी असायला हवी. 'एक सज्जन रस्त्याने एकटेच जात होते. त्यांना रस्त्यावर एक पाचशे रुपयाची नोट दिसली. आसपास कोणी ही नाही याचा अंदाज घेऊन त्या सज्जन माणसाने ती नोट उचलून स्वतःच्या खिशात घातली. याउलट त्याच वेळी जवळपास कोणी पाहणारे असते तर, त्या सज्जनाने ती नोट घेतली नसती; ही नोट आपली आहे का म्हणून विचारले असते'. बघणारे नसले की सज्जन माणसालाही चोरी करण्याचा मोह होतो, हे पटवून देण्याचा प्रयत्न.
असेच कुलूपाबद्दल बोलले जाते. कुलूप हे चोरापासून संरक्षण करण्यासाठी नसते तर सज्जन माणसाला चोरीचा मोह होऊ नये म्हणून असते. यात तथ्य वाटते. कारण चोरी करण्यासाठी ठरवून आलेल्यासाठी कुलूपाचा अडसर राहात नाही.
याबाबीचा विचार करता माझे असे मत आहे की, जास्तीत जास्त काम प्रेरणा देऊन, शिक्षकांचा मित्र बनूनच होते. परंतु क्षेत्रीय अधिकारी यांनी आपल्यातील प्रशासक 100% मरून जाऊ देता कामा नये. कधीतरी एखादा कावळा मारुन वेशीवर टांगायलाच हवा. मात्र अशा प्रकारची कारवाई अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत अनुसरावी. सर्व प्रकारचे प्रयत्न करुन ही ज्याच्या वर कुठलाच परिणाम होत नाही, अशा राॅजर्स कर्व्ह मधील लेट लतिफ 16% पैकी एखाद्यावर अनुसरावी. अशा कारवाई मुळेही त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता कमीच असते. म्हणून मी म्हणत असतो, कारवाई ही संबंधितामध्ये सुधारणा करण्यासाठी नसते तर इतरांना संदेश देण्यासाठी असते.
म्हणून विस्तार अधिकारी यांनी शैक्षणिक बाबीवर लक्ष केंद्रित करताना जाॅबचार्ट नुसार आपल्या इतर अधिकार/ कर्तव्याकडे दुर्लक्ष करु नये असे मला वाटते.
माझा हा विचार अनेक मान्यवरांना बंडखोरीचा वाटू शकेल. परंतु प्रदीर्घ अनुभव आणि सर्व प्रकारच्या शिक्षकांच्या अभ्यासातून माझे हे मत तयार झाले आहे.
धन्यवाद!
- मल्हार माने
शिक्षण विस्तार अधिकारी
बीट मंगरुळ.ता. तुळजापूर