Home

सुस्वागतम ! आपले सहर्ष स्वागत करीत आहे !

Friday, 6 July 2018

राज्यातील शिक्षकांची गुणवत्तेवर आधारित भरती करणारे पवित्र वेबपोर्टल आजपासून सुरु...*


*राज्यातील शिक्षकांची गुणवत्तेवर आधारित भरती करणारे पवित्र वेबपोर्टल आजपासून सुरु...*

*शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले उदघाटन*
नागपूर दिनांक 6 जूलै, - महाराष्ट्रातील शिक्षकांची भरती गणुवत्तेवर आधारित व पारदर्शक पध्दतीने व्हावी या उद्देशाने शिक्षण विभागाने “पवित्र” या बेवपोर्टलची निर्मिती केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थांच्या शाळांमधील अनुदानित, अंशत: अनुदातिन व विनाअनुदानित पदांवरील इयत्ता 1 ली ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांच्या भरतीसाठी तयार करण्यात आलेले “पवित्र” हे वेबपोर्टल आजपासून सुरु करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते “पवित्र” या वेबपोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. या नंतर या “पवित्र” वेबपोर्टल संदर्भात माहिती देताना श्री. तावडे यांनी सांगितले की, यापूर्वी खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती. परंतू, आता “पवित्र” या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रिय पध्दतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे. उपरोक्त नमूद केलेल्या संबंधित विभागामध्ये शिक्षक पदाच्या रिक्त जागा असतील तर त्या संबंधित विभागाने रिक्त पदांची माहिती “पवित्र” या वेबपोर्टलवर देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे स्थानिक वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसिध्द करावयाची आहे, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागाच्या 20 जून 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार सदरची कार्यपध्दती विषद करण्यात आली आहे, त्याची माहिती देताना श्री. तावडे यांनी सांगितले की, 6 जुलै 2018 पासून पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)  मध्ये 0 पेक्षा अधिक गुण प्राप्त असलेले विदयार्थी व शिक्षक पात्रता परिक्षा (TET) पात्र विद्यार्थी हे इ. 1 ते 5 तसेच इ. 6 ते 8 मधील प्रवर्गानुसार व समांतर आरक्षणानुसार रिक्त जागांवर पवित्र प्रणालीमध्ये अर्ज करू शकतात. इ. 9 वी ते 12 वी साठीच्या रिक्त जागांवर अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT) मध्ये “0”  पेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.edustaff.maharashtra.gov.in/pavitra या संकेतस्थळावर नोंदणी (registration) करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीचा आसन क्रमांक हाच उमेदवाराचा User Id असेल. नोंदणी करण्यासाची कार्यपध्दती User manual मध्ये दिलेली आहे.
       भरती प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे राहतील –-
1)   पहिला टप्पा – पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांनी स्वत:ची माहिती भरणे.
2)   दुसरा टप्पा – संस्थांनी पवित्र प्रणालीमध्ये online तसेच स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करणे.
3)   तिसरा टप्पा – संस्थांच्या जाहीरातीनुसार उमेदवारांनी 20 पसंतीक्रम निवडणे.
4)   चौथा टप्पा -  गुणवत्तेनुसार संस्थांना निवड याद्या उपलब्ध्‍  करून देणे.
ही निवड प्रक्रिया अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षेमधील (TAIT) गुणांच्या तसेच प्रवर्ग व समांतर आरक्षण निहाय उपलब्ध्‍ जागा, उमेदवाराने भरलेला पसंतीक्रम इ. च्या आधारे केली जाणार आहे.पेसा क्षेत्रातील पालघर, गडचिरोली येथील शिक्षक भरती पेसा मधील तरतुदीनुसार करण्यात येईल.
शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी TAIT ही परिक्षा 1 लाख 78 हजार उमेदवारांनी उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी “पवित्र” च्या माध्यमातून अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये याची दक्षता विभागाने घेतली आहे. अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीच्या (TAIT) आसन क्रमांकानुसार अर्ज करण्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर (Pavitra Portal) वर देण्यात आले आहे.
त्यानुसार उमेदवारांसाठी अर्ज तयार करण्यासाठी खालील वेळापत्रक देण्यात आले आहे, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.
दिनांक
TAIT परीक्षा आसन क्रमांक
पासून
पर्यंत
06/07/2018 ते 08/07/2018
SED_ TAIT_0000001
SED_ TAIT_0005000
09/07/2018 ते 11/07/2018
SED_ TAIT_0005001
SED_ TAIT_0015000
12/07/2018 ते 15/07/2018
SED_ TAIT_0015001
SED_ TAIT_0030000
16/07/2018 ते 18/07/2018
SED_ TAIT_0030001
SED_ TAIT_0045000
19/07/2018 ते 22/07/2018
SED_ TAIT_0045001
SED_ TAIT_0060000
23/07/2018 ते 25/07/2018
SED_ TAIT_0060001
SED_ TAIT_0075000
26/07/2018 ते 29/07/2018
SED_ TAIT_0075001
SED_ TAIT_0090000
30/07/2018 ते 01/08/2018
SED_ TAIT_0090001
SED_ TAIT_0105000
02/08/2018 ते 05/08/2018
SED_ TAIT_0105001
SED_ TAIT_0120000
06/08/2018 ते 08/08/2018
SED_ TAIT_0120001
SED_ TAIT_0135000
09/08/2018 ते 12/08/2018
SED_ TAIT_0135001
SED_ TAIT_0150000
13/08/2018 ते 15/08/2018
SED_ TAIT_0150001
SED_ TAIT_0165000
16/08/2018 ते 19/08/2018
SED_ TAIT_0165001
SED_ TAIT_0180000
20/08/2018 ते 23/08/2018
SED_ TAIT_0180001
SED_ TAIT_0199143
वरील वेळापत्रकात दर्शविलेल्या कालावधीमध्ये नमूद केलेल्या बैठक क्रमांकांच्या उमेदवारांनाच अर्ज करता येतील.  या व्यतिरिक्त इतर बैठक क्रमांकांच्या उमेदवारांना इतर तारखांना अर्ज करता येणार नाही. वरील कालावधीत अर्ज करताना उमेदवारांच्या TAIT  व TET परीक्षेमधील नाव, जन्मतारीख, लिंग या माहितीमध्ये तफावत असल्यास अशा अमेदवारांनी पडताळणीसाठी नमूद केलेल्या जिल्हयातील शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांचेकडून संबंधित उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून माहिती approve करण्यात येईल. अशा उमेदवारांना दिनांक 23/08/2018 नंतर पवित्र प्रणालीमध्ये अर्ज करण्याची सुविधा देण्यात येईल. उपरोक्त वेळापत्रकामध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बदलाबाबतची माहिती पवित्र पोर्टलवर दर्शविण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी वेळापत्रकातील बदल वेळोवेळी पाहणे आवश्यक राहील.
उमेदवारांना येणाऱ्या तांत्रिक व इतर अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालयामध्ये तसेच ज्या जिल्हयांमध्ये महानगरपालिका आहेत, त्या जिल्हयांच्या महानगरपालिका कार्यालयातील शिक्षण विभागामध्ये मदत कक्ष उभारण्यात आलेला आहे.
उमेदवारांनी त्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हयातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक),  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालय किंवा महानगर पालिका कार्यालयाच्या शिक्षण विभागातील मदत कक्षाशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे

You tube वरील video डाउनलोड करा सोप्या पद्धतीने

You tube वरील video डाउनलोड करा कोणत्याही सॉफ्टवेयर अथवा वेबसाइट शिवाय*
🎆🎆🎆🎆👇👇👇👇
You tube वर शैक्षणिक, सामाजिक, मनोरंजक, व इतर अनेक विषयावर रोज हजारो videos upload होत असतात तर हजारो videos सतत ऑनलाइन पाहिले जातात. तसेच इतर सॉफ्टवेर वापरून अनेक videos डाउनलोड केले जातात. वेगवेगळ्या नवीन विषयावरील videos चा खजिना म्हणून You tube या social media कडे पाहिले जाते. Google च्या अनेक सर्विसपैकी you tube हा एक अत्यंत महत्त्वाचा सर्विस आहे. दूरस्थ शिक्षणासाठी you tube सर्विस मैलाचा दगड ठरत आहे.
        you tube वरील असंख्य videos ऑनलाइन पहायला मिळते मात्र डायरेक्ट डाउनलोड करून घेण्याची सुविधा देत नाही. you tube वरील आवडलेली videos डाउनलोड करण्यासाठी IDM, You tube downloader, Tubemate, अशा त्रयस्थ (Third party) सॉफ्टवेयरचा मदत घेऊन video डाउनलोड करावे लागते. आपल्या जवळ सदर सॉफ्टवेयर उपलब्ध नसल्यास मात्र you tube वरील video डाउनलोड करण्यासाठी इतर web site चा मदत घ्यावे लागते web अड्रेस माहीत असल्यास ठीक नाही तर परत शोधत बसावे लागते.

           या सर्व प्रक्रियातुन जाण्यापेक्षा आणखी एक नवीन मार्ग आहे..... त्या बाबत आपण माहिती घेणार आहोत.

       

        You tube वरील videos डाउनलोड करण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेयर, add ins अथवा web site ची गरज भासणार नाही. you tube वरील video डाउनलोड करा अगदी कांही क्लीकमध्ये...

you tube वरील video जेंव्हा आपण प्ले करतो तेंव्हा browser वर वरच्या बाजुला म्हणजे आपण ज्या ठिकाणी web अड्रेस टाइप करतो त्या ठिकाणी (अड्रेस बार) सदर video चा एक लिंक दिसत असते जसे की...

https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

वरील प्रमाणे लिंक दिसेल यामध्ये थोडसं बदल केला की video डाउनलोड होईल.

पद्धत :- 1 (Method 1)
वर सांगितल्या प्रमाणे लिंक मध्ये काय बदल करायच पहा.

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

      आता यामध्ये youtube समोर "ss" add केला की तयार झाला डायरेक्ट लिंक जसे की...

तयार झालेला नवीन लिंक-
https://www.ssyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :- 2 (Method 2)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

वरील लिंक मध्ये youtube समोर फक्त "dl" add करा जसे की...

तयार झालेला लिंक-
https://www.dlyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-3 (Method 3)

मूळ लिंक-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये youtube च्या अगोदर फक्त "save" add करा जसे की...

नवीन लिंक-
https://www.saveyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-4 (Method 4)

मूळ लिंक:-
https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

यामध्ये https://www. काढून youtube समोर pwn ठेवा जसे की...

नवीन लिंक:-
pwnyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-5 (Method 5)

मूळ लिंक-

https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

     यामध्ये youtube समोर kick लिहा जसे की...

नवीन लिंक:-
https://www.kickyoutube.com/watch?v=Jbn39j-xa-k

पद्धत :-6 (Method 6)

मूळ लिंक-

https://www.youtube.com/watch?v=Jbn39j-xa-k

       यामध्ये youtube काढा त्याठिकाणी फक्त "deturl"
टाइप करा जसे की...

नवीन लिंक-

https://www.deturl.com/watch?v=Jbn39j-xa-k