Home

सुस्वागतम ! आपले सहर्ष स्वागत करीत आहे !

Sunday, 5 March 2017

*वार्षिक स्नेहसंमेलन*

*जि.प. प्रा.शा.धोत्री*

काल दिनांक 4 मार्च 2017 रोजी प्रा. शा. धोत्री येथे वार्षिक स्नेहसम्मेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून विस्तार अधिकारी आदरणीय माने साहेब , प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्री शिवाजी साठे, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. अश्विनी शिवाजी साठे, माकणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री वाघमोडे साहेब , श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनायक माने सर , तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. मिर्झा बेग साहेब , शा. व्य. समिती अध्यक्ष श्री गजेंद्र जाधव, उपाध्यक्षा सौ. मंजूळा माने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे श्री सतिश ढोणे सर , श्री सतिश महामने सर, श्री तात्या चौगुले सर, श्री विवेकानंद खलाटे सर यांची सुध्दा प्रमुख उपस्थिती होती. स्वागत गीतासाठी कुमार ओंकार सतिश महामने यांनी उत्कृष्ट तबलावादन केले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कार सादर केले. गावकर्यानी भरभरून प्रतिसाद देताना 47000 रूपयांचे बक्षीस केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी शा.व्य.समितीचे सर्व सदस्य व गावकर्यानी तन मन धनाने सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

*धन्यवाद*
*वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाने साजरे.     .............................   बीट मंगरूळ -                   मंगरूळ बीट अंतर्गत जिल्हा प.कें.प्रा.शा.येवती शाळेचे वार्षिक स्नेहसंमलेन उत्साहाने साजरे झाले.                                कार्यक्रमा उद् घाटन  जि.प.सदस्य सालिहा अझर मुजावर  यांचे हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य सौ.सोनाली संदीप बनसोडे , येवती चे सरपंच श्रीकांत हजारे ,उपसरपंच जयवंत पाटील ,शा.व्य.स.अध्यक्ष  सौ.रेखाताई तेलंग ,उपाध्यक्ष जीवन अशोक चव्हाण ,विकास कार्यकारी सोसायटी चे चेअरमन श्री .अनिल शिंदे ,उद्धव शिंदे ,माजी न्यायाधीश ज्ञानेश्वर भरगंडे , दिनकर पाटील , महादेव गवळी ,कालिदास पाटील ,किसन भाऊ भरगंडे ,शा.व्य.स.माजी अध्यक्ष मन्मथ मुडके ,रोहिदास शिंदे ,सुर्यकांत गवळी तसेच शा.व्य.स.सदस्य , ग्रामपंचायत सदस्य आणि समस्त गावकरी उपस्थित होते.                              कार्यक्रमात शेतकरी आत्महत्या , दारूबंदी ,देशभक्ती ,व्यसनमुक्ती ,मराठी गीते ,हिंदी गीते , कोळी गीते सादर करण्यात आली.                छञपती शिवाजी गीताने सर्वांची मने जिंकली.पिंगा गीताने नृत्याचा आविष्कार पाहावयास मिळाला . शेतकरी दादा आत्महत्या करू नको या गीताने मन हेलावुन टाकले.जलवा जलवा , आय लव्ह माय इंडिया गीताने देशप्रेम जागृत केले. अंबाबाई गीताने तर गोंधळच घातला.काँमेडी डान्स  ने तर अचंबित केले.                              'चांगभलं चांगभलं जोतीबाचा चांगभलं ' या गीताने मोहित करून टाकले.                                ग्रामस्थांनी पैशाचाचा पाऊस पाडला. एकूण बक्षीस रोख स्वरूपात ३६१०० जमा झाले.१५ डझन बिस्किटे मिळाले.                कार्यक्रमाची यशस्वितेसाठी शाहू गुरव , दिलीप गायकवाड , हिप्परगा ताड जि.प.चे शिक्षक कोळी सर , गावातील महिला यांनी खुप सहकार्य केले.                शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल गायकवाड , शिक्षकवृंद कोलते सर,बाबुराव चव्हाण ,अनंत फुलसुंदर ,श्रीमती हौसलमल मँडम यांनी अथक परिश्रम घेतले.                                          विशेष सर्व कार्यक्रम प्रौजेक्टरवर दाखवण्यात आला. तंञस्नेहीं अनंत फुलसुंदर यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सुञसंचलन उमेश सुर्वे यांनी केले. उत्कृष्ट सुञसंचलन केल्यामुळे ग्रामस्थांनी कौतुक केले. आभार प्रदर्शन कोलते सर व कालिदास पाटील यांनी केले*

प्रा.शाळा चिंचोली


प्रा.शाळा बसवेश्वर नगर चिवारी


प्रा.शाळा कालेगाव


प्रा.शाळा दिंडेगाव