प्लॅस्टिक :
आजकाल आपण कुठे बाहेर जरी जात असलो तरी आपण प्लॅस्टिकची कॅरीबॅग घेऊन जातो. पाणीसुद्धा पिताना प्लॅस्टिकची बाटली वापरतो. खाद्यपदार्थ, दुध आणताना किंवा मागवल्यावर ते प्लॅस्टिक पिशवीतूनच येते. म्हणजेच आपण सर्वबाजूंनी प्लॅस्टिकने वेढले गेलो आहोत. पण या प्लॅस्टिकचा शोध लावला कोणी?
पहिले मानवनिर्मित प्लॅस्टिकचे प्रात्यक्षिक १८६२ साली लंडन येथे भरलेल्या ‘ग्रेट इंटरनॅशनल’ या प्रदर्शनात अलेक्झांडर पार्कस यांनी दाखविले होते. हे प्लॅस्टिक सेंद्रिय सेल्युलोज पासून बनले होते. नंतर १८६८ मध्ये, जॉन वेस्ली ह्याट्ट यांनी सेंद्रिय सेल्युलोज मध्ये कापूर मिसळून सेल्युलॉइड तयार केले. पातळ व लवचिक अशा फोटोग्राफीच्या फिल्म्स बनवण्यासाठी या सेल्युलॉइड वापरले जाऊ लागले, जे आधी हस्तिदंतापासून बनवले जात असे.
त्यानंतरच्या काळात अनेक सेंद्रिय व जैविक पदार्थ वापरून प्लॅस्टिक बनवले जात होते. १९०७ साली लिओ हेंड्रिक बिकलँड यांनी पहिले कृत्रिम अधिकृत प्लॅस्टिक तयार केले. त्यांनी यासाठी बॅकेलाईट हा शब्द वापरला, जो त्याचे वैज्ञानिक नावापेक्षा सोपा होता. त्याचे वैज्ञानिक नाव पॉलीऑक्सीबेन्झीलमिथिलीनग्लायकोलनहायड्राइड हे होते. बॅकेलाईट हे फिनॉल आणि फोर्मलडीहाइड यांच्या एकत्रितरीत्या मिश्रणातून बनले होते.
त्याच्याआधी प्लॅस्टिक लाकूड, धातू, काच, चिकणमाती आणि झाडांपासून मिळणारे रबर अशा नैसर्गिक वस्तूंपासून बनवले जायचे. प्लॅस्टिकच्या शोधामुळे अनेक उद्योगांना भरारी मिळाली. आजही अनेक उद्योग प्लॅस्टिक तयार करणारे आहेत व प्लॅस्टिकवर पूर्णतः अवलंबून असणारे आहेत. पण अशा काही प्लॅस्टिकच्या वस्तू ज्या फक्त वापरा आणि फेकून द्या (Use and Throw) अशा बनवलेल्या असतात, त्या आजही आपल्या मानवी जीवनाला घटक ठरत आहेत. कारण प्लॅस्टिक हे अविघटनशील आहे. ते वर्षानुवर्षे जमिनीत पुरले तरी आहे त्या स्थितीत राहते. म्हणून प्लॅस्टिकचा वापर कमी करा.
म्हणूनच महाराष्ट्र सरकारने १८ मार्चपासून प्लास्टिक बंदी केली आहे. चला पर्यावरणाचा समतोल राखुयात.
No comments:
Post a Comment