Home

सुस्वागतम ! आपले सहर्ष स्वागत करीत आहे !

Sunday, 5 March 2017

*वार्षिक स्नेहसंमेलन*

*जि.प. प्रा.शा.धोत्री*

काल दिनांक 4 मार्च 2017 रोजी प्रा. शा. धोत्री येथे वार्षिक स्नेहसम्मेलन मोठ्या उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून विस्तार अधिकारी आदरणीय माने साहेब , प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्री शिवाजी साठे, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. अश्विनी शिवाजी साठे, माकणी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री वाघमोडे साहेब , श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनायक माने सर , तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. मिर्झा बेग साहेब , शा. व्य. समिती अध्यक्ष श्री गजेंद्र जाधव, उपाध्यक्षा सौ. मंजूळा माने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे श्री सतिश ढोणे सर , श्री सतिश महामने सर, श्री तात्या चौगुले सर, श्री विवेकानंद खलाटे सर यांची सुध्दा प्रमुख उपस्थिती होती. स्वागत गीतासाठी कुमार ओंकार सतिश महामने यांनी उत्कृष्ट तबलावादन केले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कार सादर केले. गावकर्यानी भरभरून प्रतिसाद देताना 47000 रूपयांचे बक्षीस केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी शा.व्य.समितीचे सर्व सदस्य व गावकर्यानी तन मन धनाने सहकार्य करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

*धन्यवाद*

No comments:

Post a Comment